कधी वाटते उडून जावे दूर देशी,
जिथे असेल आनंद दाही दिशी.
कधी वाटते हरवावे गरदीत तरी,
हळूच लपवत डोळ्यातल्या सरी.
कधी वाटते असावे जवळी कोणी आपले,
ज्याच्या मिठीत वाटेल दुःख सारे संपले.
कधी वाटते रहावे एकटे, नको भावना!
सोबती असून ही कोणी, नको त्या वेदना!
Late Post.
Wrote on account of International Mother Language day.